Ad will apear here
Next
ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा
सोलापूर : बेंगळुरू येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेने सोलापूरमधील ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात एक कार्यशाळा आयोजित केली होती. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे विशाखा परुळेकर व सुमित शिर्के यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. 


कार्यशाळेत विशाखा परुळेकर यांनी सॉफ्टस्किल, कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल, बॉडी लँग्वेज, टाइम मॅनेजमेंट, इंटरपर्सनल स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, डिजिटल मेकिंग अॅबिलिटी, कॉर्पोरेट स्किल, मेल अॅटिट्यूड, ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू याबद्दलची माहिती दिली.

कार्यशाळेला अध्यक्ष ए. जी. पाटील, सचिव एस. ए. पाटील, संचालक डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील, उपप्राचार्य प्रा. व्ही. व्ही. पोतदार उपस्थित होते. तसेच सोलापूरमधील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील १८० विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिस्बा अत्तार यांनी केले. आभार प्रा. एस. व्ही. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग’चे विभागप्रमुख प्रा. एस. जे. लिगाडे, प्रा. एस. व्ही. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LYZWBE
Similar Posts
‘ए. जी. पाटील अभियांत्रिकी’च्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे सुयश सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत सन २०१६मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीची परीक्षा मे महिन्यात घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले. महाविद्यालयाचा निकाल ८० टक्के लागला. हीना सैफन इनामदार (सिव्हिल इंजिनीअरिंग) हिने ९
पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. रंगनाथन जयंती सोलापूर : ‘ग्रंथालय शास्त्राचे आद्य प्रवर्तक म्हणून डॉ. एस. आर. रंगनाथन यांना ओळखले जाते. १२ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करतात. भारताला ग्रंथालय क्षेत्रात जागतिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या डॉ. रंगनाथन यांचा ग्रंथालयाच्या विकासात मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची
ए.जी.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम सोलापूर : महाराष्ट्र शासनाने २०१६ पासून प्रत्येक जुलै महिन्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला आहे. या उद्देशाने २०१७ मध्ये चार कोटी वृक्ष लागवड करण्याचा महाराष्ट्र शासनाचा संकल्प आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाच्या एन
ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात योगदिन साजरा सोलापूर : आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवी जीवन तणावग्रस्त होत आहे. या तणावातून मुक्ती मिळविण्याचा सोपा उपाय म्हणजे योग. योगाभ्यास हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. मानवी दीर्घायुष्याची, तसेच निरोगी तणावमुक्त आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली आहे. याचा प्रसार व्हावा म्हणून २१ जून हा जागतिक योगदिन म्हणून साजरा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language